बुधवार, ३१ ऑक्टोबर, २०१८

विजयदुर्गोत्सव : किल्ले बळवंतगड

'उत्सव क्षणांचा.. आपल्या सणांचा


           'ऋतुरंगआयुष्यात आनंद घेऊन येतात ..न्हाई ? 
बहारलेला हा निसर्ग हि चैतन्यं उसवून नाचत असतो. सदा अन सदा  ...`वर्षा ऋतूच्या आगमना-नंतर , त्याच्या परतीच्या वाटेपर्यंत ...त्याच्या एकूण सहवासात,  हिरवाईचा साज शृंगार करून उधाणलेला हा  निसर्ग ...हि अथांग चराचर सृष्टी  आणिअभिमानाची पोलादी छाती फुगवून ...ताठ मानेनं उभा असलेला हा  सह्याद्री , 
मनाला विट्ठलावणी आर्त अशी साद घालत राहतो. 

त्याच्या ह्या  भक्तिओढीनंच  ह्या देहरूपी मनाची... मग अखंड पायपीट सुरु होते. कधी रुळलेल्या त्या पायवाटेतनं  तर कधी अनवट वाटा पायदळी घेत ...आनंदाच्या स्वाधीन..आनंदी आंनदी होऊन जात ..

आनंदाचे डोही आनंदतरंग । आनंदचि अंग आनंदाचे ॥१ 

प्राचीन 'थळ घाट 'म्हणजेच आजचा 'कसारा घाटत्यावर लक्ष ठेवण्यासाठी तसेच 'जव्हार त्रंबकेश्वर मार्ग दृष्टीक्षेपात राखण्यासाठी,
थळ घाटाच्या समोरच मुख्य डोंगरा पासून विलगलेल्या डोंगरा कड्यावर ,  तटबुरुजाचा शेला चढवून...
स्वराज्याची कडी सांभाळणारा हा  एकेकाळचा बळरक्षक म्हणजेच 
'बळवंतगड'

( 'शिलाहारांनी ह्याची निर्मिती केलीअसा उल्लेख 'सदाशिव टेटविलकरह्यांच्या ''दुर्गसंपदा ठाण्याचीह्या पुस्तकात मिळतो. 
तसेच सुरत मोहिमेच्या पाऊलखुणा हि....हा किल्ला आपल्या उराशी जपून आहेहे हि तितकंच महत्वाचं.. )

हाच बळवंतगड ...
कधीकाळी हरहर महादेवच्या गर्जनेत गजबजुन गेला असेल.
तोरण फुलांनी आणि स्वस्तिकांनी सजला रंगला असेल .
मावळ्यांच्या गस्तीने दिन रात राबता राहिला असेल.
रयतेच्या सुख दुःखात आकंठ मिसळला असेल.
आनंद अश्रूत मोकळा झाला असेल.

ह्या अश्या बळवंतगडावर... 
थळ घाटाच्या ह्या रक्षकावर  'दुर्गवीर आणि दुर्गसखाह्या निस्वार्थ  भावनेने आणि निष्ठेने शिवकार्य करणाऱ्या संस्थामार्फत 'दसराहा आनंदोस्तव हा विजयदुर्गोत्सव संयुक्तपणे..उजळ मनाने आणि मोकळ्या उत्साहात  साजरा करण्यात आला.


                                           हे  भाग्य,  पुन्हा एकदा.. माझ्या वाटेल आलं.  
मला नव्याने ते मिळालं.  (आणि ते मिळतंच रहावं ) ह्यातच सारं सौख्य आहे.  

म्हणतात ना आनंदाला परिवार हवा असतो.सगेसोयरे हवे असतात . 
तो परिवार इथे भेटला. एकत्रित मिसळला ,  रुळला आणि एकजूट हि झाला. इथल्या स्थानिकांना सोबत घेऊनत्यांना विश्वासात  घेऊन त्यांच्यात मिळून मिसळून ..
सामाजिक बांधिलकी आणि मानवी मूल्य मनाशी ठेवत आणि ती जपत. त्याचाच एक छोटासा भाग म्हणून ,
उरलेल्या पैश्यातून ...
जि. प. विहिगाव-रेंज* ह्या शाळेसाठी...हवी असणारी ५०० लिटर ची टाकीआणि गडावर फडकवण्यासाठी ६ फूट उंच असा भगवा ध्वज त्यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला.

'सोनियाची दिनी सोनियाचे क्षण '
विजयदुर्गोत्साव खऱ्या अर्थानं असा आमुचा सार्थ झाला...

संकेत पाटेकर

     जि. प. शाळा. विहिगाव रेंज ..

      विहिगाव
     गडाकडे कूच करताना
     गड माथा चढताना ..दृष्टीक्षेपात येणार दृश्य...

   गडावरील वास्तू अवशेष ...

     गड सजावट...

     गडावरील देवता...

     गडाची सजावट  होण्या पूर्वी केलेलं श्रमदान

    गडावरची वेताळ देवता
   
     गडावरची वेताळ देवता..


 

     वेताळ देवतेजी पूजा करताना ..ग्रामस्थ


स्थानिकांशी संवाद साधताना..

    निवांत क्षण

   गडावरून दिसणारा परिसर ..

गडावरची  देवता 
लल्लाटी टिळा  

गडाच्या माथ्यवरन दृष्टिक्षेपात  येणार परिसर ..


पाण्याचं टाकं ..

पाण्याचं टाकं 
      शाबूत असलेली तटबंदी
 
     परतीचा मार्ग 

टनेल ..
बुधवार, १२ सप्टेंबर, २०१८

ताहुली'च्या वाटेवर ...


अजस्त्र रूप धारण केलेला हा आपुला  'सह्याद्री' त्याचं हे 'रौद्र' पण तितकंच 'वडीलधारी रूप'  मनाशी  एकदा का पांघुरलं गेलं की,  त्याची 'सांगता' हि आपल्या शेवटच्या श्वासाशीच,  हे  ठरलेलंच.
जिव्हाळ्याचं हे नातंच असं सह्याद्रीचं  अन आपलं,
म्हणूनच
पाऊलं वळततात ती,
आपणास पुजणीय अश्या ह्या 'सह्यदेहाकडे' ..
शिवप्रेरीत ह्या अफाट कातळ कोरीव 'सह्यसख्याकडे' बेलाग- बुलंद ह्या 'सह्यरुद्राकडे ' सृष्टीच्या ह्या कलात्मक रंगसाधनेतुन...तिच्याच उबदार घन सावलीत,
अनवट कुठल्याश्या वाटेतनं.. सुखाची एक एक पाऊलं टाकत..

प्रति 1 तर , बरेच दिवस होऊन  गेले..कुठे काही जाणं न्हवतं.  भटकणं न्हवतं.
मित्राचे फोन खणखणू लागायचे,
''अरे चल ..मी...अमुक तमुक ह्या ठिकाणी उद्या निघतोय , येतोस... ? ''
इच्छा असूनही , काही कारणास्तव मग मुद्दाम टाळाटाळ करायचो ,
म्हणावं तर भटकंती ही तात्पुरती खंडित केली होती. काही एक कारणास्तव ,
पण म्हणतात ना..एकदा का ह्या 'सह्य रुद्राचं  शिवरूप'  मनात साठलं कि पाऊलं हि आपसूक पुढे होतात..धावू लागतात ..
उंच कड्या ह्या  कपाऱ्यातून , राकट सह्या वेढ्यातून .. पानपाचोळ्या रानवनातून... सृष्टीच्या ह्या हास्य तरंग गीतासोबत ...घुंगवत्या गंधित वाऱ्यवानी.. मनाच्या उनाड अवस्थेतून ..समाधिस्त अवस्थेकडे ..

प्रति 2 

 ताहुलीची वाट सुद्धा अशीच धरली . निळाईला गवसणी घालणाऱ्या सुळक्यांवर , सराईतपणे चढाई मोहीम करणाऱ्या मित्राचा 'दुर्ग' भूषणचा  कॉल आला. संवाद साधला गेला.
आणि तेंव्हाच वेळ काळ ठरवून ...रविवारच्या मुहूर्ताला शिक्कामोर्तब करत आम्ही ठरल्या दिवशी ताहुलीच्या दिशेने वाटचाल करू  लागलो.
जवळ जवळ ..तीन चार वर्षाने हा गडी पदरगड सारख्या मोहिमेनंतर पुन्हा भेटणार होता .
आणि त्याचबरोबर इतर जुने सवंगडी , ज्यांच्या समवेत मी सह्याद्रीच्या खुल्या मोकळ्या आसमंतात मुक्तपणे विहार करू लागलो त्ये....लक्ष्या उर्फ  बाळू दा ..आमचा पहिला इंजिन,  किशोर ..आणि मिलिंद उर्फ मिळू ....
हि सारी मंडळी ..सह्य सोबती... ह्या त्या नात्यांनी बांधलेली जोडलेली  , आता फारशी मोहिमेला येत नाहीत. पण त्यांच्या येण्याने आज नवा हुरुप आला होता . आनंद  देहबोलीतून ...मनातून आणि संवादातून  अविरत असा तणतणत होता.
त्या  आनंदातच ...गप्पांचा हास्य पट मांडत  आम्ही कल्याणहून ..खाजगी वाहनाने (काळी पिवळी omani- 400 /-मात्र जाण्याचे ) ताहुलीच्या पायथ्याची पोहचते झालो.

प्रति 3 
  प्रति 4

ताहुली :
कल्याण -  मलंगगड  मार्गावर ...अर्धा तासाच्या  धीम्या  वेगवान प्रवासानंतर ..कुशवाली गावाच्या  भोवताली पसरलेला मुळात हिरवाईने साज शृंगार केलेला आणि कड्या बेचक्यातून फेसाळ शुभ्र रंगाचा वाहता , निथळता आनंद  देऊन  मनोमन सुखावणारा मखमली असा डोंगर. गड नाही.
माथेरान हि त्याची भाऊबंदकी
तिथपासून सुटावलेली कातळ धार .... अजस्त्र कड्या कपारीचा देखणा नजारा.. आपल्यापुढं ठेवत  इथवर विसावलेली आहे.
पेब उर्फ विकतगड ,  नाखिंड - चंदेरी म्हैसमाळ  ...मलंगगड ..हि ती सोनसाखळी...
  

 साधारण साडे आठ वाजता ..शहरीवलयापासून दूर ..कल्याणहून तेरा पंधरा  किमीच्या अंतरावर  निसर्गाने उधळलेल्या रंगसाधनेतून .. आम्ही कुशवालीत प्रवेश केला.
साधारण दोनशे अडीचशे वस्तीच हे नंदनवंन...(तिथल्याच  एका काकांच्या  सांगण्यावरून ) निसर्ग सौन्दर्यान नटलेलं खेडं , भात शेती करून  तसेच शहरी नोकरी पत्करून , आपलं जीवनरथ चालविणारे  इथले गावकरी.

त्यांच्याच नेहमीच्या पायवाटेवून ....ताहुलीचा  मागोवा घेत ..आम्ही पुढे मार्गीस्थ झालो.
निसर्गाने फुलविलेल्या ,  सजवलेल्या तसेच गंधाळलेल्या अवीट क्षणांचा आनंद घेत...
 - संकेत पाटेकर
  
प्रति 5


प्रति 6


प्रति 7
 प्रति 8


 प्रति 9
 प्रति 10

प्रति 11                                                                                                                                                                  

प्रति 12

ताहुलीच्या उंचीवरून दिसणारं  बदलापूर शहर ...

 प्रति 13
 प्रति 14

- संकेत पाटेकर

सहभागी सदस्यांची  नावे :
१. भूषण
२. लक्ष्या उर्फ बाळू द
३. किशोर
४. मिलिंद
५. विकास
६ . मी आणि इतर दोघे 

जाण्यास लागलेला वेळ : कुशवली गावापासून  ...साडे चार तास ..(माथा -  मठ )


महत्वाची टिपणी : निसर्गात जात आहातच तर त्याचं कौतूक करायला हि नक्कीच शिका. त्याला समजून घ्या. त्याकडून बोध  घ्या  शिका. आयुष्यभर उपयोगी पडेल.

उगाच आपल्याजवळच कचरा तिथेच सोडून आणि निव्वळ मौज मस्ती साधून ..ह्या सृष्टीचा आणि मानवजातीचा अपमान करू नका..इतकंच.