शुक्रवार, ६ फेब्रुवारी, २०१५

सह्याद्रीतलं स्वप्नं : साल्हेर -सालोटा -मुल्हेर- मोरा- भाग -१


1
साल्हेरं - नाव उच्चारलं कि सर्वप्रथम डोळ्यासमोर काय येत असले तर ती साल्हेर ची लढाई , तो झुंजार रणसंग्राम, , मराठ्यांनी फोडलेला तो मुघली वेढा ...
पेशवे मोरोपंत पिंगळे , सर सेनापती प्रतापराव गुजर ह्यांनी मिळून योजलेली हि एक नियोजनबद्ध अशी मैदानी लढत . मराठ्यांनी यशस्वी रित्या जिंकलेली . अन इतिहासाच्या पानावर अजरामर झालेली .
त्यासाठी हे मन खांस ओढवलं जात ..ते साल्हेर- मुल्हेर - च्या दिशेने बागलाण प्रांतात .

बागलाण म्हणावं तर सधन -सुपीक प्रदेश ..गुजरात आणि महाराष्ट्राच्या सीमेवरीला, हिरवेशार अगदी , झाडा झुडपांनी अन शेत बांधांनी सजलेला , - नद्यां - तळ्यांनी परिपूर्ण , काळेकभिन्न कातळ कड्यांनी चहु बाजूंनी वेढलेला...., मनाचा मोठेपना सांगत सुटलेला , इतिहासाच्या पानात अजरामर झालेला , महाभारत काळापासून पावन झालेला . असा हा एक सुपीक संपन्न प्रदेश ...


2


अश्या ह्या सुपीक संपन्न प्रदेशांत अन बलदंड किल्ल्यांच्या सहवासात काही एक दिवस पहुडण्याचा नुकताच योग जुळून आला.
मनी खळखळत राहिलेलं सह्याद्रीतल माझ एक स्वप्न पूर्ण झालं.
सृष्टीच्या तो नयनरम्य देखावा अन आपल्या ह्या गड-कोटांची ती कीर्तिवंत महती, ते शौर्य , ह्या ने तर चित्तच हरपले .

साल्हेरच्या परशुराम मंदिरा येथून , चाहु दिशेला डोंगर दरयांचे ते धुक्यात वेढावलेले ते विलोभनीय दृश्य पाहून अस वाटू लागल . जणू
स्वर्गीय वातावरणात आम्ही प्रवेश केला आहे .
स्वर्ग बघितलाय कुणी, कसा असतो ?कसा दिसतो ? पण ह्या भूतलावरील हे असे मन वेडे सृष्टी सौंदर्यदृश्य पाहून स्वर्गाची उपमा आपोआप चाल करून येते .मुखाशी ..ओठावर ..,
तेंव्हा वाटतं , एकाग्र दृष्टीने ह्या सृष्टी सौदंर्य कडे फक्त पाहताच राहावं . अन इथेच ठाण मांडाव कायमच ..... :) :) :)


परशुराम मंदिर

3


धुक्यात वेढावलेले ते विलोभनीय क्षण

4


कसे गेलो :-
नित्य नेहमीच्या त्या त्या क्षणानुसार यंदा हि आमची सभासद आकडेमोड ७-८ वरून घसरून थेट ३ वर आली अन येताना पुन्हा ४ वर स्थिरावली.
सभासद आकडा किमान १२ हि न भरल्यानं थेट खाजगी वाहन न करता एसटी महामंडळीचा लाल डब्यातून थेट जाण्याच पर्यायच आमच्या समोर आ वासून उभा होता . त्यामुळे थेट काय तो विचार करून थेट आम्ही निघालो.
डोंबिवली वरून यतीन , घणसोली वरून अनुराग अन ठाण्यावरून आम्ही म्हणजे मी असे एकूण तीन आकडी संख्या ने आमचा प्रवास सुरु झाला.

कल्याणहून रात्री १२.२१ च्या आसपास सुटणाऱ्या अमृतसर एक्सप्रेसने कसेबसे नाशिक गाठले. (तिकीट साधारण डब्याचा असून देखील हि गर्दी म्हणून आरक्षण डब्यातून प्रवास केला ह्यातच खूप मोठ सुख होत. पुढे तक येउन देखील त्याने काही विचारल नाही हे त्यातल्या त्यात नवल म्हणायला हवं )रात्रीचा तो निरव शांततेत चाललेला तो गूढ प्रवास मात्र एकंदरीत सुखद असा होता .

पहाटे साडे तीन च्या आसपास नाशिक ला उतरलो तेंव्हा एके ठिकाणी मोठ्या आवाजात, लावलेली ती हिंदी सुरेल गाण्यांनी तर वातारवणाच संगीतमय करून टाकल .
त्या लयातच स्टेशन मधून बाहेर पडलो अन ओल्ड एसटी स्थानकात जाण्यसाठी रिक्षा गाठली.

नाशिक रेल्वे स्थानक ते ओल्ड एसटी डेपो , साधारण १० - ११ किलो मीटर च अंतर , ते गाठण्यासाठी साधारण पंधरा वीस मिनिट गेली .
डेपोत पोहोचलो . ताहाराबाद साठी एसटी ची चौकशी गेली . अन मग कडकडनाऱ्या अंगअंग झोंब नाऱ्या त्या गारव्यात वाफाळलेल्या चहाचा एक एक घोट घशात उतरवत गेलो. विशेष म्हणजे
अशा कडकडनाऱ्या थंडी मध्ये वाफाळलेली चहा प्यायला मिळण म्हणजे ...अह्हाहा !

तर असो..

साडे पाच दरम्यान ताहाराबाद साठी एसटी आली अन प्रवासाची हि झुंबड उडाली.
जागा मिळविण्यासाठी जो तो जे समान हाती मिळेल ते खिडकीतून सीट वर टाकू लागला.
त्यात कमाल म्हणजे एकाने तर आपला चक्क मोबाईल सीटवर टाकून दिला. मोबाईल पेक्षा सीट त्याला इतकी महत्वाची वाटावी ह्याचच जरा नवल वाटलं. असो..

आम्ही पाठीवरल्या अवजड पाठ्पिश्व्या घेऊन पुढे सरसावलो . दोघांना काय ती जागा मिळाली ती तीही मागच्या उधळणाऱ्या सीटवर ...तिथेच बसकण मारली आणि निवांत झालो.

अडीस तासाच्या पहाटी प्रवासा नंतर आम्ही ताहाराबाद गाठले . अन पुन्हा चहाच घोट घेत वाघम्बे साठी चौकशी केली . तेंव्हा कळल कि आठ ची एसटी आहे. आठ वाजण्यास अजून पाच एक मिनिटे शिल्लक होती. तोच नजर इकडे तिकडे फिरू लागली तेंव्हा एक ग्रुप तिथे नुकताच पधारलेला दिसला तोही साल्हेरलाच ..प्रस्थान करण्यासाठी ..त्यांच्याशी थोडी ओळख परेड झाली.
अन आम्हा दोघा ग्रुप नि मिळून एक जीपड ठरवून साल्हेर वाटे निघालो .

साल्हेरं - गुजरातच्या डांग जिल्हा अन महाराष्ट्राचा बागलाण मुलुख ह्याना जोडणाऱ्या महत्वाच्या सहा वाटांवर लक्ष देण्यासाठी, टेहळीनिसाठी किंव्हा हेरगिरीसाठी लष्कर दृष्ट्या महत्वाचा म्हणून 'सहाहेर' नाव पडलं अन त्याचा पुढे अपभ्रंश होवून पुढे ते साल्हेर झालं...अन ते आज हि कायम आहे. ( महेश तेंडूलकर ह्यांच्या पुस्तकातून )
त्याचबरोबर परशुरामांची हि तपोभूमी .येथूनच त्यांनी सागराला मागे हटविण्यासाठी बाण सोडला..

तर अश्या लष्कारी दृष्ट्या महत्वाच्या अन पावन तपोभूमीत आमचा शिरकाव झाला .
अन हळूहळू तना मनासह ह्या मातीतून जाताना भूतकाळातल्या त्या रक्तरंजित पण विजयी आठवणीत गर्क होवून गेलो

घोड्यांच्या टापांचा आवाज , मातीचा विजयी गंधयुक्त धुरळा डोळ्यासमोर पसरू लागला.
येथूनच कुठे ते दौडले असतील . इथेच उरल्या सुरल्या मुघलां नि मराठ्यांपुढे गुढघे टेकले असतील.
शरणागती पत्करली असेल .
इकडेच कुठे लढाई दरम्यान रणशिंग फुंकले गेले असतील त्याचा आवाज अजूनही निनादतोय बघा , हाच तो भूप्रदेश हि ती माती. भाळी टीळा वी अशी ...

इतिहास , प्रेरणादायी इतिहास ..भारावून टाकतो , असा शौर्यगीतांनी ...त्या स्वरांनी ..

अर्धा पाऊन तासा नंतर आम्ही वाघांबे गाठले. गावात अजूनही कुड्यांची काही घर आपलं अस्तित्व दाखवून होती. त्याने माझ्या गावाच्या जुन्या घराची आठवण झाली . कालानुरुपे कुड्यांची घरांनी हळू हळू कात टाकली अन तिथे विटा सिमेंटच्या घरांनी जागा घेतली. गावाची शहरे झाली. अन गावच गावपणच हरवून गेलं कुठेतरी...अस जाणवू लागलं. ,,,पण असो काला नुसार बदल हा येतोच....अन तो असायलाच हवा .


5
6


वाघांबे गावात पोहोचलो अन लोकांच्या नजरा आमच्या कडे वळल्या . नवीन कुणीतरी आहे म्हणून ..
काही सुज्ञ मंडळी आमच्या भोवती गोळा झाली. अन आमच्यातल्या देवान घेवानाला सुरवात झाली.

किल्ल्याकडे जाणारा रस्ता , सकाळी गावाकडे येनारी एसटी , साल्हेर लं जाण्यासाठी रस्ता , तिथली एसटी सेवा , एखाद हॉटेल, राहण्याची सोय , आदी काही विषयांची विचारपूस झाली . .
अन साल्हेर कडे आम्ही कूच केल.

7


ताहाराबाद वरून येणारा रस्ता वाघांबे करत - साल्हेर वाडी कडे वळसा घेत जातो .
वाघांबे गावातून त्याच सरळ रस्त्या मार्गे पुढे गेल्यास पंधरा एक मिनिटावर नदीचा पूल लागतो .
तो ओलांडला कि डावीकडे एक वाट वळते .दगड धोंड्याची , खाच खळग्याची , मातीची..वेडी वाकडी अशी ...ती आपल्याला साल्हेर - सलोटा खिंडीकडे घेऊन जाते.

उभ्या चढणीची, छातीचा भाता वर खाली करणारी हि वाट पुरती दमछाक करणारी आहे. ह्याचा अनुभव त्या वाटेवरून गेल्यास नक्कीच मिळतो.

साल्हेर-सालोटा खिंडीकडे जाताना, समोर दिसतेय ती साल्हेर खिंड


8


सोंडीवाटे हि वाट आपल्याला साल्हेर-सालोटा खिंडी कडे घेऊन जाते . अन तिथून दोन पाय वाटा फुटतात एक साल्हेर दिशेने तर दुसरी पुढे सालोट्या कडे .


9


साडे नऊच्या आसपास आम्ही वाघाम्बे गावातून आगेकूच केली . अन दुपारच्या तळपत्या सूर्य किरणानंसोबत साल्हेर -सलोटा खिंडीत पोहोचलो.
थोडा उशीरच झाला होता.
वेळेच नियोजित गणित चुकलं होत . एक तास नुसताच वाया गेला होता . चुकणार्या वाटेकडे नकळत पाउल वळल्यामुळे ...

पण असो , खिंडीत पोहचलो अन एक दीर्घ श्वास घेतला. एकदाची खिंड गाठली ह्यांचा आनंद चेहर्यावरून ओसांडत होता. स्फुरण चढत होत . पुढच्या पाउल वाटेसाठी ...
त्या जोशातच सालोट्याकडे वळलो .


खिंडीतून होणार साल्हेरच दर्शन

10


सालोट्या कडे पाय वळले काही अंतर पार केलं अन साल्हेरचं हे रांगड रूप नजरेत भरलं. पहातच राहावं अस...

11


पुढे निमुळत्या अन घसाऱ्या युक्त वाटेतून पुढे जात राहिलो.
एकीकडे सरळसोट दरी , 'पाउलं हळूच टाका हो , अस म्हणत आम्हास जणू सावध करत होती.
त्यामुळे नजर अगदीच स्थिर होती. पाउला पाऊलावर...,

साल्हेर पेक्षा सालोट्याची वाट थोडी खडतर आहे. हे पुस्तकात वाचलं होत अन ते आता प्रत्यक्ष अनुभवत होतो .
अश्यातच अचानक पक्षांचा एक थवा आकाशी डोक्यावरून पुढे झेपावला. तेंव्हा पाउलं जागच्या जागीच स्थिरावली. इतकं सुंदर दृश्य मला वाटत मी पहिल्यांदाच पाहत असेन.
ते सारे क्षण नजरेत टिपून घेतले.
काही क्षण असाच स्तब्ध उभा राहिलो अन नजर सालोट्या कडे वळविली.

त्याच्या त्या दिव्य रुपानं मात्र धडकीच भरली . पुढची वाट त्या खाचेतून जाणार होती. नराचा वानर करून...


12


पण वेळ आम्हास जणू चेतावणी देत , सावध करत होती. वर वर आमच्या दशाअवतारला पाहून खट्याळपणे हसत हि होती .
बघा काय तो नीट विचार करा ? तुम्हाला पुन्हा ह्याच वाटेनिशी परतायचं आहे.
सालोटाचा उभा चढ चढून उतरून .. साल्हेर कडे मुक्कामी , ते हि अंधारायच्या आत....,
तुम्हाला तर अजून वाट हि मिळाली नाही. ? विचार करा?

वेळेच गणित तसं विस्कटलचं होत म्हणा ...

दुपारचा एक वाजत आला होता. अजून वाट ती मिळत न्हवती .
त्यात सालोटा चढून उतरून साधारण ४ ते ५ तरी झाले असते . त्यात पुन्हा साल्हेर सर करायचं
म्हणजे रात्र हि ठरलेलीच...
त्यातल्या त्यात पोटातले कावळे हि भुकेने वेडावू लागले होते .
सोबत पाण्यचा प्रश्न हि होताच.....ते हि संपत आल होतं.
अन महत्वाच म्हणजे शरीर हि खूप थकल होत.
अशा स्थितीत ..सालोटा अर्धवट सोडून पुन्हा साल्हेर कडे जाण्याचा मनसुबा आम्ही एकमताने पास केला.
अन साल्हेर कडे कूच केले.
मनोमन म्हणत दादा , पुढच्या वेळेस नक्कीच येऊ पुन्हा तुझ्या अंगा खांद्यावर लोळण घ्यायला .


पुढे धीम्या गतीनं साल्हेर कडे कूच केलं. अन सालोट्य़ाच्या ह्या रुपानं अगदी मोहित झालो.

13


साल्हेरचा पहिला दरवाजा लागला. त्याकडे पाहत , त्याची छबी घेत पुढे निघालो
14


15
अन भव्य दिव्य सालोट्य़ा च पुन्हा मनोवेधक दर्शन झालं.


पुढे दगडात कोरलेल्या पायऱ्या लागल्या...

16


अन साल्हेर चा दुसरा भक्कम दरवाजा नजरे समोर उभा ठाकला...

17
दुसर्या दरवाज्या पाठोपाठ तिसरा कमानयुक्त दरवाजा हि लगेच नजरेस आला.
त्या दरवाज्यातून सालोट्या हे राकट रूप कॅमेरात टिपून घेतल.अन पुढे सरसावलो.

19


20


पाच दहा मिनिटे पुढे चालत राहिलो . अनेक गुहा अन कोरड्या टाकी दृष्टीक्षेपात येत होत्या.
पण त्या गुहा राहण्याजोग नाही . हे त्याकडे पाहून कळत होत. त्यातच चौथा दरवाज्याजवळ येउन ठेपलो.

चौथा दरवाजा...

येथून पुढे आम्ही मोकळ्या पठारावर पोहचनार होतो. साल्हेर च्या भव्य परिसरात आमचा प्रवेश झाला होता. आनंद दुनानत होता. चेहऱ्यावरून विजयी मुद्रा झळाळत होती
ती विजयी मुद्रा घेऊनच आम्ही नव्या जोश्याने , रेणुका मंदिराचा शोध घेऊ लागलो .
त्याच्याच पुढे आसपास कुठे त्या गुहा होत्या . जिथे आजचा आमचा मुक्काम होणार होता .
त्यासाठी पाउलं झप झप पुढे पडू लागली.


21


पुढे गेलो अन काही अवशेष अन ह्या दोन पाण्याच्या टाक्या दिसल्या .
पाणी अर्थात पिण्याजोग असं न्ह्वातच. ते वर वर दिसतंच होत.


22


टाक्याच्या पुढेच, गंगासागर तलाव अन रेणुका मंदिर दिसलं.


24


रेणुका देवी अन श्री गणेश. त्यांच्यातील डोळ्यातले भाव निरखून पहा . काय वाटत ?

25


गंगासागर तलाव..
मंदिरच्या चौकटी मधून तळ्याच हे शांत रूप कॅमेरात कैद केलं

2627
दिवसभराचा छाती एवढा चढ , ह्याने फारच थकवा आला होता . अंगात तशी ताकदच उरली न्हवती .
मुक्कामी जेंव्हा ती गुहा नजरेस आली तेंव्हा तिथल्या तिथे अंग झोकून दिले .
आडवा झालो .पंधरा एक मिनिटे तरी तसाच शांत पडून राहिलो .
तना- मनाला आलेला शीण दूर करायला असे क्षण हवेच असतात . आपल्या रोजच्या धावत्या जीवनात हि ...
प्रसन्नतेचा , नव चैतन्याचा लेप मनभर पसरवत...पुन्हा त्याच जोमानं पुढे होण्यासाठी.

राहण्यसाठी उत्तम जागा ..हीच ती गुहा ..
एका वेळेस साधरण ३४ एक जण आरामशीर राहू शकतात.


28


दुपारचे साडे तीन झाले होते. शरीर मनाला आराम देऊन .आता पोट पूजेच्या मागे लागायला हवं होत . त्यासाठी लगभग सुरु झाली .
तसे गडावर आम्ही तिघे सोडून इतर अजून पांच'च मंडळी हजर होती. त्यामुळे सगळ निवांत होत . आवाज गोंगाट अगदी शून्यात होते.
गुहेचा एक कोपरा आम्ही झाडून पुसून आमच्यापुरत लक्ख करून ठेवला अन खादीसाठी(अन्नग्रहण ) पुढे बसलो.

नित्य नेहमीप्रमाणे अन सवयीप्रमाणे अन टिकावू म्हणून (ते असणे क्रमच म्हणा) तिघांकडे अन्नाचा एकच प्रकार होता . ते म्हणजे 'थेपले' तेही मेथिचेच.. . त्यासोबत कुणी चटणी आणली होती . तर कुणी पिचकु...

ते खाऊन पाच एक मिनिटाने सरपणासाठी बाहेर पडलो . वर येता येत येता हालत इतकी खराब झाली होती कि सोबत सरपण घेण शक्य झालं नाही. त्यामुळे कुठे काही मिळतंय का ? ह्यासाठी बाहेर पडलो .
अन नारळाच्या शेंड्या सोडून इतर काहीच हाती न मिळविता तसंच गुहेत परतलो.
साल्हेर च्या माथ्यावर सरपण कुठेच मिळणार नाही. हे माहित होत अस नाही . पण त्या उभ्या चढणीने अंगातली शक्तीच नाहीशी झाली होती. त्यामुळे ते राहून गेलं.

आता पुढचा प्रश्न निर्माण झाला होता.
आता पुढे काय ? कस करायचं ? जेवणा खावंनाच काय ?
पण तो हि प्रश्न पुढे सुटला . इतर ट्रेक बंधूनी आणलेल्या सरपनावर आमचं भागणार होत .
शेवटी ज्याला त्याला जो तो उपयोगी पडतोच . .. पण तरीही आमच्यावतीने जे काही मिळेल ते आणून
आम्ही त्यात थोडी अधिक भर घातली . अन निवांत झालो .


29


संध्याकाळच्या धो धो पावसाने अवेळी हजेरी लावून धिंगाणा घातला होता . त्यामुळे सगळेच त्या गुहेत एकजूट झाले होते .
गोंधळ , बडबड वाढली होती .
जवळ जवळ चार एक जणांचा ग्रुप अन त्यात किमान ३४ जन तरी गुहेत उपस्थित होती.
रात्र त्यातच सरली .
अन पहाटेपरी जाग आली . झोप तशी न्हवतीच मुळी .
पण सूर्य नारायणाचे दर्शन घ्यावे म्हणून साडेसहाच्या टोल्याला कॅमेरा हाती घेऊन गुहेच्यावरून पटपट परशुराम मंदिर गाठले.

परशुरामांची हि तपोभूमी ..थेट आपल्याला पुराणकाळात घेऊन जाते
येथूनच त्यांनी बाण सोडून समुद्र हटवला होता...तिथे मस्तक नकळत टेकले जाते.


30


परशुराम मंदिरात पोहोचलो . दर्शन घेतलं . अन चहू बाजूच्या सृष्टी सौंदर्याने फार सुखावून गेलो .
हि अमाप माया देणारी सृष्टी ..
तिच्या सहवासात एकदा आलं कि ती लगेच आपलसं करून टाकते. कोण, कुठला?
हे ती जाणत नाही . जाणून घेत नाही बस्स प्रेमाच्या वर्षावात ती न्हाऊन टाकते. अमाप सुख देऊन..

मायेचा प्रेम भरला हळुवार स्पर्श करून ....


वाटत असंच पाहतच राहावं ह्या सृष्टी सौंदर्याकडे, त्याच्या गोजिऱ्या रुपाकडे टकमकतेने...एकाग्रतेने ..
धुक्याची हि दुलई अन अन त्यात निवांत विसावलेली हि सहयवेडी रांग पाहत...
3132


खरच हा निसर्ग अद्भुत आहे... अलंकारित आहे....वेडावणारा...वेड लावणारा ..

सुर्यास्ताच्या अन सुर्योदयाच्या तांबड्या सौम्य क्षितीज छटा सह्याद्रीच्या कड्यावरून गड-किल्ल्यावरून पाहणं ,अनुभवनं म्हणजे एक दिव्य सोहळाच...मनाला भुलविणारा ..
अंधाराकडून प्रकाशकडे नेणारा .....
33


कधी कधी वाटतं ' विवधरंगी जड- अवजड मनाची हि नाती ' जपण्यापेक्षा निसर्गाच्या उबदार मायेने भरलेल्या कुशीत शांत पडून रहावं. त्याच्याशीच मनमोकळेपणाने काय तो संवाद साधावा . तृप्त नजरेने निसर्गाच्या विवध घटकांकडे नुसतंच पाहत राहावं. अन त्यातून उतू जाणारा आनंद घटका घटकाने गिळंकृत करावा . बस्स..
34


किती वेळ तरी आम्ही त्या टेकडावर ते सृष्टी सौंदर्य न्हाहाळत होतो. घटका घटकाने प्राशन करत होतो .
ह्या क्षितीज रेषेनं असेच ह्या हृदयी मनावर आपली छाप उमटवली... 3536


पण वेळेचं मर्यादि भान हे प्रत्येकाला ठेवावाच लागतं. नाहीतर पुढंच गणित कोलमडतं .त्यासाठी आवरावर करावीच लागते.
आम्हाला हि पुढे मुल्हेर गाठायचं असल्याने धाव घ्यावी लागली . साल्हेर ला निरोप देऊन ...
37


साधारण नऊ- सव्वा नऊ च्या आसपास ...तळ्याकाठी मस्त ताजे तवाने होवून आम्ही साल्हेर वाडीकडे कूच केले .
किल्ल्याच्या दोन्ही वाटेने ये जा करणं हे आलाच .
किल्ला तसा चहू बाजूने पहावा .

येताना वाघाम्बे वरून आम्ही खिंड गाठली अन साल्हेर सर केला . अन आता साल्हेर वाडीकडून मुल्हेरच्या दिशेने आमचा मोर्चा वळविला.

गंगासागर तलाव..38एक एक छबी कॅमेरात बंदिस्त करत ..

39


40


41


42


साल्हेर वाडी कडे जाताना लागणारा दरवाजा ..43


44


45


46


एका वेगळ्या अंगाने टिपलेला फोटो
47साल्हेर कडा अन दरवाजा ..48


49


50


कमळ पुष्प ..51


52


पायथ्यापासून साल्हेर ...
53


डोंगर कुशीत वसलेली साल्हेर वाडी ..
54


क्रमश :-
पुढचा भाग लवकरच ...
आपलाच
संकेत
०६.०२.२०१५