रविवार, २८ सप्टेंबर, २०१४

देवगिरीच्या ' शोभा मावशी ' अन वेरूळचा ' शाहरुख '

मी आज किल्ल्याविषयी लिहणार नाही.
देवगिरी किल्ला तर अप्रतिमच आहे . अद्भुत आहे. वैशिष्टपूर्ण अगदी ..बळकट्ट त्याला तोड नाही.
वेळ काढून मी ह्यावर पुढे नक्कीच लिहेन ...कारण लिह्ण्यासारख खूप काही आहे.
पण आज मी इथे लिहिणार आहे ..दोन व्यक्तीवर जे ह्या प्रवासात भेटले . अन मनावर कायम घर करून राहिले .

'
देवगिरीच्या मनमिळावू अश्या शोभा मावशी ..अन कानातल्या कुड्या विकणारा निर्मळ हास्याचा झरा 'शाहरुख'


वेरूळचा ' शाहरुख '

अहो सर घ्या ना ? १२० रु. फक्त .
बघा तुमच्या गर्ल फ्रेंड ला होईल . गर्ल फ्रेंड साठी तरी घ्या हो .
नको नको म्हटले तरी तो माझा पिच्छा काही सोडत न्हवता .
नाव विचारले तर म्हणे शाहरुख .
हेअर स्टाईल वरून तर तसा तो शाहरुखच वाटत होतां. :असो त्याच्या चेहर्या वरच हास्य मात्र अगदी निखळ होतं.त्यात स्वार्थपणा अजिबात नव्हता .

सांजवेळ होती , सहा वाजून काही एक मिनिटे झाली होती . कैलाश लेणे पाहून नुकताच गेट बाहेर पडलो आणि तिथल्या एका स्थायिक फेरीवाल्याने गाठलं.
हाती मार्बल ची सुंदर पेटी आणि हत्तीचे कोरीव काम केलेले ती सुबक मूर्ती . त्याने दाखवायला सुरवात केली . आणि मी सहज म्हणून ह्याचे किती असे प्रश्न करू लागलो .
आणि त्याने त्यावर लगेचच उत्तर द्यायला सुरवात केली . ह्या पेटीचे २५० रुपये , ह्या हत्तीचे २०० रुपये.
ते ऐकून मी नकारार्थी मान फिरवली . खरं तर ती नक्षीकाम केलेली सुंदर मार्बल पेटी घेऊसी वाटत होती. पण २५० रुपये जरा जास्तच वाटत होते .

कुठे हि बाहेर जाताना मग तो ट्रेक असो किंव्हा पिकनिक ठरवलेल्या पैशात सर्व भागवायच किंव्हा शक्यतो कमी खर्च करायचं .ह्यात मी नेहमीच प्रयत्नशील असतो .
कुणास ठाऊक कुठे आणि कशी पैशाची गरज भासेल ? ते काही सांगता येत नाही ना ?

तरी हि काही गोष्टी अशा असतात कि मनाचा मोह काही केल्या आवरत नाही .
नाही नाही म्हणता त्याची किंमत कमी करून , ती सुंदर नक्षीकाम केलेली मार्बल पेटी मी औरंगाबादची आठवण म्हणून विकत घेतली . आणि पुढे चालू लागलो.
तोच पुन्हा एक इसम पुढे येत त्याजवळ असलेली अजिंठा वेरूळची पुस्तके आणि काही CD's विकत घ्या असे विनवू लागला . त्याला नाही म्हटल . आणि पुन्हा पुढे चालू लागलो.
आणि तोच समोर उभा राहिला तो शाहरुख . शाळेतल्या मुलांच्या वयाचा , हेअर स्टाईल तर अगदी शाहरुख सारखीच. बोलन मात्र अस्सल मराठी .तिथल्या स्थानिक भाषेतलं

चेहरा कसा तर हसरा .त्याच्याकडची ती वस्तू मी नक्कीच विकत घेईन अशा खात्रीचे त्याच्या चेहऱ्यावरचे भाव . हाती एक प्लास्टिक पिशवी , त्यात विक्रीसाठी ठेवलेलं सामान .
मला पाहून लागलीच त्याने बोलायला सुरवात केली . हाती असलेल्या पिशवीतून एक वस्तू काढून मला त्याने दाखविली . ज्याचा मला काहीच उपयोग न्हवता . म्हणून मी सरळ नाही म्हटलं.
आणि ती वस्तू घेऊन तरी मी काय करणार होतो ? मुलींच्या कानातल्या त्या कुड्या . पण तरीही नाही म्हटल्या वर
अरे सर घ्याना घ्या ? तुमच्या गर्ल फ्रेंड ला होईल.
अस कळकळीने तो म्हणू लागला .
माझी कुणी गर्ल फ्रेंड नाही रे ? अस मी तितक्याच स्पष्टपणे म्हणू लागलो .
अहो गर्ल फ्रेंड नाही तर बहिणी साठी घ्या ? बहिणीला होईल ?
ह्यवर मी काय बोलणार ,अनुत्तर झालो . म्हटलं चला बहिणीसाठी काहीतरी घेऊन जावू .
आवडल्या तर नक्कीच खुश होतील . तेवढंच भावावरच प्रेम अधिक दृढ होईल .
आणि म्हणून मी त्या कानातल्या कुड्या सांगितलेल्या किमतीपेक्षा कमी करून त्याच्याकडून विकत घेतल्या .
आणि तोच त्याच्या मनाची पुन्हा लगभग सुरु झाली .
माझ्या मित्रांना तो विनवू लागला .
तुम्ही सुद्धा घ्या ना एखादं ?

माझ्या मित्रांनी काही ते घेतल नाही . पण त्याची छबी मात्र त्यांनी कॅमेरात बंदिस्त केली .
आणि जाता जाता त्याला विचारल , ' फेसबुक वर आहेस का रे ?
त्याला त्यातल काही कळल नाही. पण चेहर्यावर त्याच्या निखळ हास्य उमललं अन मुखातून शब्द बाहेर पडलं ते पुन्हा शाहरुख .
असा हा शाहरुख ..प्रवासात भेटलेला ..मनावर हळूच आपला ठसा उमटवणारा .
प्रवास हा अशा व्यक्ती रेखांनीच यादगार होतो नाही का ? त्यातूनच खरी संस्कृती समजते . पोटासाठी चाललेली जीवाची तगमग कळते.
- संकेत य .पाटेकर


________________________________________________________________________________
________________________________________________________________________________

शोभा मावशी

आता पुन्हा याल ते एकत्रच जोडीने या, बर का ? (म्हणजे लग्न करून बायको सोबत )
देव तुम्हाला सदा हसत ठेवो.
जाता जाता मावशीचा आशीर्वाद आणि तिचे प्रेमळ शब्द मनाशी बिलगून आम्ही आमच्या परतीच्या मार्गी लागलो.
देवगिरी किल्ल्याला निरोप देत २ दिवसाची आमची हि संभाजीनगर (औरंगाबाद) सफर आता पूर्ण होणार होती.

जवळ जवळ पाऊन ते एक तास , आम्ही देवगिरी किल्याच्या बालेकिल्ल्यावर स्थित, ' पेशवेकालीन गणेश मंदिराच्या ओट्यावर, ' त्या शांत वातावरणात स्वभावाने अगदी मोकळ्या मनाच्या , शांत तितक्याच बोलक्या असणारया शोभा मावशीची बोलण्यात अगदी दंग झालो होतो .
त्याही मन मोकळेपणाने आमच्याशी बोलत होत्या . स्वतःबद्दल तसेच इथला इतिहासाबद्दल मुक्त कंठाने आम्हास सांगत होत्या.

त्यांची हि तिसरी पिढी . नाव - शोभा खंडागळे .
सकाळी ७ वाजल्यापासून ते संध्याकाळी ६ ते सवा सहा वाजेपर्यंत ते बालेकिल्ल्यावर स्थित पेशवेकालीन '' गणेशाची'' भक्ती भावाने पूजाअर्चा करतात .येणाऱ्या भाविकास साखरेचा प्रसाद देऊन, दमलेल्या थकलेल्या मनास पाणी देऊन त्यांच मनशांत करतात . त्यांची विचारपूस करतात अगदी मनोभावे .

अगदी कधी कुणास स्वतःसाठी बनवून आणलेला जेवणाचा डबा देखील ते प्रेमाने देतात . खाऊ घालतात .
त्यांची गणेशावर खूप श्रध्दा आहे . जे काही आहे ते त्याच्या आशीर्वादाने असे ते समजतात.

त्यांना पगार वगैरे अस काही हि नाही . जे भाविक देवापाशी श्रद्धेने जो काही पैका ठेवतील तोच त्यांचा पगार .
दौलताबाद गावातच त्याचं मोठ घर आहे.
त्यात त्यांची सासू , तीन मुले - त्यांची सून- नातवंड असे सारेजण एकत्रित राहतात.

साऱ्यांच नेहमीच चांगल चिंतनारया मावशी स्वभावाने अगदी मोकळ्या मनाच्या आहेत.
आणि अशा मोकळ्या मनाच्या बोलक्या व्यक्ती क़्वचितच भेटतात आपल्या जीवन प्रवासात.

मनावर आपली छाप उमटविणारे हे दोघ , निरागस , निर्मळ मनाचे ....
संभाजीनगर (औरंगाबाद) ची सफर यादगार ठरली ती ह्यांच्यामुळेच. :)
- संकेत पाटेकर
०४.१०.२०१३


________________________________________________________________________________
________________________________________________________________________________

देवगिरीचे काही फोटो ...
________________________________________________________________________________
________________________________________________________________________________


वेरूळची वैशिष्टपूर्ण अन अचंबित करणारी अशी कैलास लेणी ...