मंगळवार, ११ जून, २०१३

काजव्यांच्या राशीतून ..........लुकलुकता राजमाची !!


काजव्यांच्या राशीतून ..........

तुम्ही म्हणालं राजमाची अन काजव्याच्या राशीतून '' , हि काय भानगड आहे. राजमाची किल्ल्याशी त्याचा काय संबंध  ? त्याच साधं सरळ अस उत्तर आहे.

लोणावल्याहुन हून जर तुम्ही तुंगार्ली मार्गे राजमाची करण्याचा विचार करत असाल अन न ते हि रात्रीच्या दाट अंधुक काळोखात, पावसाच्या अगदी रिमझिम ओसरत्या सरित , ' तर तुम्हाला काजव्यांच्या नैसर्गिक स्वयंमचलित प्रकाशाचे लुक लुकणारे, मन मोहून टाकणारे अनेक तारे जागोजागी झाडांवर पाहायला मिळतात. 
त्याने मनात अनेक आनंद तवंग उठू लागतात.

निसर्ग तसां अद्भुत अन रहस्यमयच आहे . निसर्गाची अनेक चमत्कारिक रूप , निसर्गाची गट्टी जमाविल्यास नक्की पाहता येतात . अन ते समजून घेता येतात .

रात्रीच्या दाट काळोखातून जाताना आम्ही ते अनुभवलं. 
तसं काजवा हा प्रकार मी काही पहिल्यांदाच पाहत न्हवतो. पण काजव्यांच्या राशीच राशी , पाउला पाउलन्वर..
झाडांवर आंनद नृत्य करताना मी पाहिले न्हवते.  त्याचं ते लुकलुकनार प्रकाशमय नाच , मनाला अजून चकाकी देत होता .येणारया पुढच्या वाटे मधला अंधार जणू नाहीसा करत होता .

रात्री पावणे दोनच्या आसपास आमच्या सात जणांचा समूह लोणावळा स्थानकात दाखल झाला .
आणि पुढे काही वेळ पोट पूजा करत पावणे तीनच्या आसपास लोणावळा एसटी डेपो येथून तुंगार्ली मार्गे मार्गीक्रमण झाला , चालता चालता बोलता बोलता ट्रेक ला अखेर सुरवात झाली .
पण त्याआधी काही मजेशीर प्रसंग घडले ,ते असे कि ,

आम्हाला प्रवास करायचा होता तो सिद्धेश्वर एक्स्प्रेसच्या च्या साधारण(General ) डब्यातून (त्याप्रमाणे तिकिटे काढली होती ) , पण सीएसटी वरून येणारे तिघेजण आले ते बिनधास्तपणे आरक्षित डब्यातून , त्यामुळे आम्ही हि तिघे ठाण्यात सिद्धेश्वर एक्स्प्रेस दाखल होताच आरक्षित डब्यात जावून बसलो जिथे सीएसटी वरून येणारे मित्र भेटले..

त्यांनतर पाच एक मिनिटे झाली असतील नसतील तोच तिकीट चेकर डब्यात प्रवेश करता झाला .
आणि प्रश्न करू लागला.
Staff है क्या ? Staff ?
'TC 'ची नि आम्हा सर्वांच्या नजरा आमच्यातल्या त्या अंबरीशकडे वळल्या . 
एकटक सर्वजण त्याकडेच पाहू लागले .

अंबरीश हि काही बोलेनसा झाला टीसीला पाहून ? टीसी चे मुखशब्द मात्र स्वरात चालूच होते
Staff है क्या ? Staff ?
काही क्षणाने अंबरीश ने हाताचा पंजा उचलत मूकशब्दाने होकारार्थी उत्तर दिले
.ते पाहून टीसी ने पुन्हा एक प्रश्न उपस्थित केला ?
कोनसे Deparments से ?

आता अंबरीश मात्र मनातून गोंधळाला नि सरळ नाही म्हटले ?
तेंव्हा टीसी ची मस्तकी आग तळपायात गेली .

कबसे बोल रहा हुं Staff है क्या Staff ? असे त्याचे गडगडणारे शब्द धो धो गतीने बरसू लागले. 
आम्ही मात्र हळूच मग पाठ पिशवी घेत मुकाट्याने ट्रेन मधून त्या डब्यातून खाली उतरलो. 
नि Genral डब्यातून कसे बसे करत कल्याण गाठले नि पुन्हा एका टीसीशी गोड धोड बोलून आरक्षित डब्यातून लोणावळ्याला दाखल झालो . अशी हि गंमत ..

रात्रीच्या शांत वातारणात पावसाच्या सरीने न्हाहून निघालेल्या काळ्याभोर नितळ स्वछ ,डांबरी रस्त्यातून तुंगार्ली मार्गे आमचा प्रवास सुरु होता . एक एक पाउलं पुढे पडत होती . मन ...एकेका पाउलान सोबत मनोमन नाचत बागडत होतं .

राजमाची पहिल्यांदाच करत असल्याने त्याचं कुतूहल नि किल्ले भेटीची ची ओढ मनास सतत प्रसन्नता निर्माण करत होती. त्यात रात्रीच ते वातारवण किती अलाहादायक होत . मन फ्रेश असल्याने पाउलं देखील पटपट पडत होती . 
काही वेळेत एक उड्डाण पूल ओलांडून आम्ही उप्पर डेक्क resort च्या फलकां इथे पोचलो . इथून काही अंतर मागे डांबरी रस्त्याची सीमारेषा संपूष्टात आली होती .

आता पुढचा रस्तामार्ग ...दुर्तफा दाट गर्द झाडींनी अन पावलान खालच्या दगड धोंडांनी , ओलसर लाल मातीनी  युक्त असा नटलेला होता . त्यात चालता चालता रात्रीच्या च्या अंधार्या काळोखात काजव्यांचा दिव्य प्रकाश मनाला उजळून टाकत होता. जणू दिव्य रोशानाईत आमचं जंगी स्वागत सुरु होत .

काही वेळाने , वळणा वळणाचा तो बराच अंतर पायी पार केल्यावर , काजव्यांच ते दिव्य स्वरूप कॅमेरा मध्ये टिपून घेण्यासाठी... काही वेळ आम्ही थांबलो .  
हे काही वेळ म्हणजे जवळ जवळ ३० ते ४० मिनिटे हं  ..!
माझ्या साध्याश्या  डिजिटल  कॅमेरा मधून ...ते क्षण टिपण्याचा मी फार प्रयत्न केला.  पण सर्व प्रयत्न व्यर्थ ठरले. 

मितालीने मात्र तिच्या SLR मधून , बराच वेळ ट्रायपॉड वर कॅमेराच अंग इकडून तिकडे मोडवीत त्याची तीक्ष्ण नजर, त्या काजाव्यांकडे वळविण्याचा प्रयत्न केला. त्यात ती सफल हि झाली असेल म्हणा .
पण एकंदरीत त्या वेळच ते वातावरण खरच खूप सही होतं . 

''निसर्गाला पडलेले सुंदर स्वप्न'' हे काही दिवसा अगोदर गीतू ने म्हटलेलं वाक्य मनाभोवती घिरट्या घेत होत. स्वप्नाच्या रंगीत दुनियेत मन न्हावून निघत होतं .

त्यातच पुढे अधिक वेळ न दवडता , साधारण ४ :३० च्या सुमारास आम्ही पुन्हा चालू लागलो . 
वळणा वर वळण घेऊ लागलो. काही ठिकाणी चिखल इतका साचला होता कि त्यात आमच्या शूज , फ्लोटर्स वजनदार झाले होते . त्यामुळे एकेक पाउलं वर उचलताना चिकटलेल्या त्या चीखलेचा भार पायंना जाणवत होता.

साधारण बराच अंतर पार केल्यावर , पहाटेच दृश्य हळू हळू उजेडात येत होतं.
माणसांच्या आवाजा इतका तंतोतंत मिळणारा एका पक्षाने (कस्तुर पक्षाने घातलेला तो शिळ मनास संगीतमय तालावर नाचवू पाहत होता . पुढे पुढे अनेकानेक पक्षीय संगीतमय स्वर , मनास भिडू लागले .

पहाट झाली . रिमझिम पाउस सरी अलगद अंग खांद्यावर बरसू लागल्या . अन निघून हि गेल्या .

रात्री पाउने तीन ला सुरु केलेली पायपीट थोडा वेळ विश्रांती साठी थांबली . 
रस्त्याला पाठ टेकवून वर नभाकडे पाहताना मनास किती प्रसन्नता वाटत होती. 
पायांना हि थोडी विश्रांती मिळत होती .

पाच दहा मिनिटे गेल्यावर , जांभलीच्या रानातून पुढे वाट निघालेली , त्या वाटे मधून आम्ही चालू लागलो . 
अस करत करत आम्ही गावाच्या वेशीवर असलेल्या गणेश मंदिरात मुक्काम ठोकला. 
तो जवळ जवळ १ तास भर. तिथेच मग न्ह्याहारी झाली . अन डोळ्या वरची थोडी झोप हि पूर्ण झाली .

अधिक उशीर होऊन नये म्हणून पुन्हा पायपीट चालू केली .
मंदिराच्या उजव्या अंगाला रस्त्याला लागूनच तटबंदीचे काही अवशेष दिसत होते .
ते मागे सरत , पुढे श्रीवर्धन किल्याला वळसा घालत नि मनरंजन श्रीवर्धन ह्यांची एकत्र जोडीगोळी पाहत आम्ही उधेवाडीत प्रवेश करते झालो .

- क्रमश :
पुढील भाग लवकरच ..........

संकेत य पाटेकर
११.०६.२०१३