बुधवार, ४ एप्रिल, २०१२

कळसुबाई ट्रेक - माझ्या शब्दात


"मनात केंव्हा पासून इच्छा होती' महाराष्ट्रातील सर्वात उंच , महाराष्टाची शान असलेला ''कळसुबाई शिखर सर करायचा. आणि ती माझी इच्छा आज मी पूर्ण केली. खरच खूप अभिमान वाटतो आहे.
प्रत्येक ट्रेकर्स च स्वप्न असत महाराष्ट्राच्या ह्या उंच शिखरावर आपल पाउल ठेवायचं .

दिनांक ८/3/२०१२ म्हणजे गुरवार, होळीचा दिवस माझे दोन खास मित्र 'हेमंत कोयंडे' आणि 'ओंकार कदम' हे सहजच म्हणजे भेटण्यास अन ट्रेक विषयक बोलण्यास घरी येणार होते. घरातले सर्वजण त्यादिवशी दुपारीच गावी गेले होते, त्यामुळे घरी मी एकटाच होतो.
मित्र येणार म्हणून घरातील इतरत्र पसरलेल्या वस्तू आपआपल्या जागी ठेवत त्यांच्या येणाची मी वाट पाहत होतो. रात्री उशिरा १०:३० दरम्यान हे दोघे मित्र आले. आणि आमच्या गप्पांना उत आला. त्यामध्ये 11:३० झाले तेच कळलंच नाही.

घरातून निघताना हेमंत ने सहजच ''कळसुबाई ट्रेक' करण्याविषयी सांगितल '' आणि त्याच्या त्या सांगण्याला मी लगेचच होकार देखील देऊन टाकला. खर तर मी प्रबळगड किंवा घनगड करायच्या विचारात होतो. पण कळसुबाई च नाव येताच बाकी विचार मनातून काढून टाकल. कारण महाराष्ट्रातील ह्या सर्वात उंच शिखरावर जाण्याची केंव्हा पासून माझी इच्छा होती. आणि ती इच्छा आता पूर्ण होणार होती.

कळसुबाई शिखरावर शिक्कामोर्तब करून झाल्यावर त्याविषयी माहिती वगैरे गोळा करण्यास सुरवात मी केली .
सर्वप्रथम आमचा ग्रुप लीडर '' निलेश हळदणकर' ह्याला फोन करून माहिती मिळवली.
आणि त्यानंतर इंटरनेट च्या माध्यमातून अनेकांचे ब्लोग वाचून त्याविषयी माहिती मिळविली.
ह्या इंटरनेट ब्लोग चा खरच खूप उपयोग होतो.
कुठे अनोळखी ठिकाणी जात असता हे अनेकांचे ब्लोग आपल्याला खरच मार्गदर्शक ठरतात.

ट्रेक च्या आदल्या दिवशी म्हणजेच शनिवारी सर्व माहिती वगैरे मिळवून मी आणी माझे मित्र हेमंत, ओंकार , लक्ष्मन , किशोर, आम्ही कळसुबाई सर करण्यास सज्ज झालो.

ठाण्याहून रात्री १२:१० मिनिटांनी सुटणारी अमृतसर एक्स्प्रेसच्या जनरल डब्यातून आम्ही प्रवास करणार होतो. ठरल्याप्रमाणे सारे एकत्र आलो आणि अमृतसर एक्स्प्रेसने इगतपुरी स्टेशनला ठीक पहाटे २:३० ला पोहोचलो. ते श्वास मोकळा सोडूनच. डब्यामध्ये पाउल ठेवण्यासही जागा न्हवती. कसे डब्यात आम्ही शिरलो ते आमच आम्हालाच माहित. कोण एका पायावर उभा होता .त कोण कसा नि कसा वर्णन नाही करू शकत. त्यात पण एकाची धुलाई चालू होती. ठाण्यात दरवाजा उघडला म्हणून त्याला बिचार्या त्या म्हाताऱ्या (इतका हि न्हवता म्हातारा ) व्यक्तीला मारहाण चालू होती, खर तर त्या व्यक्तीमुळे आम्हाला आत शिरता आल. दरवाजा उघडला म्हणून .....नाहीतर सर्व पुढचा प्लान चौपट झाला असता.

असो , सुरवातीचाच प्रवास आमचा असा दमछाक करणारा झाला. पुढे इगतपुरीला उतरून आम्ही गरमा -गरम वडां पाव अन कांदाभजी फस्त करून ५-१० मिनिटे आराम करून इगतपुरी एसटी डेपोच्या दिशेन वाटचाल करू लागलो.
इगतपुरी स्टेशन च्या पश्चिमेला डांबरी रस्त्याने रेल्वे रुळाच्या समांतर नाशिकच्या दिशेने ५-१० मिनिटावर एसटी डेपो आहे.
रस्त्याने जात असता आपणास एक सुंदर देऊळ लागत. त्याच्या थोड्या पुढेच हा एसटी डेपो आहे .
नाव गाव काही नाही. सुरवातीला आम्हाला कळतच न्हवत. हाच आहे का डेपो ते .नूतनी करणाच काम हाती घेतलं असाव बहुदा.
सकाळी ५:०० ची पहिली एसटी आहे हे मी नेट वरूनही माहिती करून घेतलं होत.
पहाटेचे ३ वाजून ५ मिनिटे झाली होती अजून २ तास आम्हाजवळ होते. त्यामुळे आम्ही मस्तपैकी ताणून दिली म्हणजे झोपी गेलो. पण तेही काही वेळेसाठीच कारण राक्षस मच्छरांनी त्रास देण्यास सुरवात केली होती.आणि थंडीचा पारा देखील हळू हळू वाढला होता , मग झोप कसली येते.
पहाटेचे ५ वाजून गेले होते आता नि अजून एस टी चा पताच न्हवता. ५ चे ५:३० झाले तरीही नाही.
आम्ही मग कुठे चहा मिळतोय का ते पाहण्यसाठी निघालो नि एस टी डेपोच्या बाहेरच एक चहा च छोटास दुकान दिसलं. त्या कडकडीत थंडीत आम्हाला चहाची नितांत गरज होती. गरमा गरमा चहा पिऊन झाल्यावर १-२ मिनिटातच म्हणजेच ठीक ५:४५ मिनिटांनी आमची म्हणजेच बारी गावाकरिता बारीगाव दिशेने जाणारी एसटी stand समोर उभी होती.
पटापट एस टी मध्ये बसून निसर्गाच ते पहाटेच डोंगर दर्याचं सुंदर रूप पाहत पाहत आम्ही बारी गावात उतरलो ते ठीक ६:४५ मिनिटांनी .सुरवातीची रस्त्यालगतची ती पाटी आमचा उत्साह द्विगुणीत करण्यासाठी सज्जच होती.
कळसुबाई शिखर - महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर १६४६ मीटर . त्या पाटी जवळ ग्रुप फोटो काढून आमची पाउल बारी गावाच्या दिशेन कळसुबाई कडे पुढे पुढे सरसाऊ लागली.
वाटेत जाताना रस्त्याच्या उजवीकडे एक छोटस मंदिर दिसलं त्याच्या शेजारी काही दगडी शिल्प होती. ते सर्व कॅमेरा मध्ये कैद करून पुढे जात असता एक मोठी विहीर लागली.
गावातल्या काही काकू काकी मावशी पाणी भरत होत्या . त्यांच्या कडून आम्ही आमच्या रिकाम्या बॉटल्स भरून घेतल्या. आणि पुढे सरसावलो.

काही वेळाने गावातून जात असताना एका दुकाना शेजारी काही विरगळ दगडी शिल्प दिसली .त्या शिप्लान्चा अर्थ मात्र समजू शकलो नाही .त्याचे फोटो काढून आम्ही पुढे जावू लागलो . आता आमच्या सोबत आणखीन एक नवीन पार्टनर सहभागी झाला होता तो म्हणजे रामू (गावातील एक प्रामाणिक कुत्रा )आता कुठे चढण सुरु झाली होती. आणि सूर्यदेवाच हि आगमन झाल होत. आम्ही एक एक पाउल झप-झप पुढे पुढे टाकत मार्गीक्रमण करत होतो.

सकाळी ६:४५ ला आम्ही बारी गावातून सुरवात केली ते ठीक १०:३५ मिनिटाने आम्ही कळसुबाई ह्या महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखरावर पोहोचलो. एखाद्या लढाईत विजय मिळाल्यावर जो आनंद मिळतो. तसाच काहीसा विजयी आनंद आम्हाला झाला. वर येताना चार लोखंडी शिड्या लागल्या त्यातील तिसरी शिडी एका उंच अवघड वाटेवर आहे.


आणि ती बरीच लांब आहे. चौथी शिडी हि आपणास कळसुबाई मंदिरा जवळ नेते . मंदिरा शेजारीच एक लाब लचक लोखंडी साखळी अशीच खाली सोडून दिली आहे. ती ओढण्याचा आम्ही प्रत्येकाने पर्यंत केला . अस ऐकल आहे कि ती साखळी जो पूर्ण वर पर्यंत ओढतो त्याची इच्छा पूर्ण होते . 
(आता ते खर कि खोटं ते माहित नाही )

कळसूआईच दर्शन घेत , आम्ही सर्वांनी ती साखळी ओढण्याचा प्रयत्न केला. त्यात फक्त ओमकार नि पूर्ण वर पर्यंत साखळी ओढली . साखळी ओढण्याचा कार्यक्रम झाल्यावर अवतीभोवती च डोंगर दर्याचं ते सुंदर रूप डोळ्यात सामावून नि कॅमेरा मध्ये कैद करून आम्ही तिथे असलेल्या मुलांन कडून लिंबू पाणीचे दोन ग्लास प्रत्येकी प्राशन करून थोडा वेळ विसावलो .


दुपारचे आता ठीक बारा वाजले होते . सूर्य हि माथ्यावर आला होता. आता निघायला हव होत. कारण वेळेच्या आत घरी परतून दुसर्या दिवशी (मी सोडून)प्रत्येकाला कामावर जायचं होत . त्या ह्याने मी बाकीच्यानां उठवलं. कळसू आईला प्रणाम करून बारी गावाच्या दिशेने त्याच लोखंडी शिडी मार्गे आमचा प्रवास पुन्हा सुरु झाला.
साधारण २:३० पर्यंत आम्ही बारी गावात उतरलो. आमच्या सोबत कळसुबाई शिखर सर करणारा रामू ह्याचा निरोप घेऊन आम्ही काळ्या निळ्या जीपने शेंडी गावात आलो . बारी ते शेंडी हे साधारण २० मिनीटाच अंतर आहे . प्रत्येकी १० रुपये सीट प्रमाणे काळ्या निळ्या जीपने इथवर येता येत. इथून पुढे काही अंतर चालत गेल्यावर भंडारदराच विहंगमय सुंदर अस रूप आपणास न्हाह्यालाता येत. त्याच बरोबर बोटिंगची हि मजा लुटता येते एका फेरीची २०० रुपये .
आम्ही साधारण दुपारी ३:०५ दरम्यान शेंडी गावात उतरलो . सकाळपासून फक्त चटर फटर जे घरून आणल होत त्यावरच आम्ही आमची भूख भागवत होतो . शेंडी गावात उतरताच अगोदर पोट पूजा उरकून घ्यायचं ठरवलं नि त्याप्रमाणे एका हॉटेल मध्ये जावून बसलो , गरमा गरम मेंदू वडा, वडा उसळ , पाव भाजी आणि सोबत कॉल्ड ड्रिंक्स वर ताव मारत आमची भूख आम्ही शामिवली .
शेंडी गावातून संध्याकाळी ५ ची कसारा करिता एसटी आहे. पण ती वेळेवर कधी असते किंव्हा नाही आणि आलीच तरी त्या मध्ये बसण्याकरिता जागा मिळेलच अस नाही . कारण येताना भरगच्च भरूनच ती येते शेंडी गावातून काळी निळी (काला नीला रंगाचा पट्टा म्हणून काळी निळी ) जीप देखील आहे ती तुम्हाला घोटी गावापर्यंत नेते . प्रत्येकी २५ ते ३० रुपयांमध्ये . तिथून पुढे मग एसटी ने कसारा गाठता येत.

आमची पोट पूजा उरकून वेळ अधिक असल्यामुळे आम्ही भंडारदरा Dam च्या दिशेने निघालो.

गावात रविवारचा बाजार भरला होता. त्यामुळे रस्त्यावर माणसाची वर्दळ होती . बाजारातील एक एक वस्तू पाहत पाहत आम्ही भंडारदरा Dam वर पोहचलो. भंडारदरयाच ते भव्य मोहक रूप पाहून माझ मन आवरेना मी लगेच मित्राला माझा एक फोटो काढण्यास सांगितल .


उन्हाची ती पांढरी शुभ्र किरण आणि जलाशयातील ते निळेशार तरंगमय पाणी यांच्या संगमाने डोळे दिपवून जात होते . समोरच रतनगड खुणावत होता . काही वेळ आम्ही तसेच स्तब्ध उभे होतो निसर्गातील ते रमणीय दृश्य पाहत .
मग हळू हळू आमचे पाउल त्या किनार्याकडे जावू लागले , समोरच एक प्रवाशी बोट जलाशयाची एक रमणीय फेरी मारून परतत होती . आम्ही काही वेळ जवळील कातळा जवळ बसलो , निखळ स्वच्छ निळेशार ...पाण्यातल ते आपल स्वतःच प्रतिबिंब पाहत . ..

काही वेळाने घड्याळाकडे लक्ष गेल, सायंकाळचे चाडे चार वाजले होते मग काय आमची पावलं पुन्हा झप झप त्याच मार्गे शेंडी गावातल्या एस टी स्टेन्ड जवळ येऊन थांबली .
५ वाजता कसारा साठी एस टी आहे हे आम्हाला बर्याच लोकां कडून कळल होत म्हणजे विचारपूस करतेवेळी.
परतीचा प्रवास म्हणजे मरगळ एक प्रकारची ....हा परतीचा प्रवास नेहमीच नकोसा वाटतो .
५ ला येणारी कसारा एस टी येता-येता पावणे सहा झाले. एस टी येते कि नाही ह्याने आमचा जीव खाली वर होत होता कारण दुपारी ३ वाजल्यापासून आम्ही शेंडी गावात होतो . आणि लवकरात लवकर घरी परतायचं होत . एव्हाना आमचा चहा पाण्याचा कार्यक्रम देखील उरकला होता.

एसटी समोर येताना दिसताच सारे जण आप आपल्यां साधन सामुग्रीनिशी सज्ज झाले. एका नव्या युद्धा साठी. हो नवं युद्धच कारण कासारया पर्यंत प्रवास करणारे प्रवाशी खूप होते. आणि एस टी हि येताना अगोदरच प्रवाशांनी भरून आली होती . त्यामुळे एस टी मध्ये उभं राहण्याकरिता जागा मिळण फारच मुश्कील झाल होत. नि आम्हाला काही हि करून ती एस टी पकडन भाग होत .
कसे बसे धक्का बुक्की करून बऱयाच हाल अपेष्टा सहन करत आमचा प्रवास झाला तो सगळा उभ्यानेच .


रात्री ८:०५ च्या दरम्यान आम्ही कसारा रेल्वे स्टेशन जवळ पोहोचलो .
८:१५ मिनिटांनी CST करीता जाणारी ट्रेन फलाटावर उभीच होती. हेमंत ने पटापट रेल्वे तिकिटे काढली आणि धावत पळत पुन्हा आम्हास ती ट्रेन पकडावी लागली . आणि तिथून मग सगळे आप आपल्या घरी परतले .
आजचा कळसुबाई ट्रेक खरच अविस्मरणीय असाच होता . तो कायम लक्षात राहील माझ्याही आणि माझ्या मित्रांच्याही !!
संकेत पाटेकर
०४ एप्रिल २०१२
  
खर्च आणि वेळ :
1) ठाणे ते इगतपुरी (अमृतसर एक्स्प्रेस ) साधारण डबा
वेळ :- १२:१० pm ते २:३० am
३५ रुपये प्रत्येकी
2) इगतपुरी रेल्वे स्टेशन ते इगतपुरी डेपो (पायी चालत )
वेळ : २:५० ते ३:०० am
3) इगतपुरी डेपो ते बारी गाव (ST)
वेळ: ५:४५ am ते ६:४५ am
4) बारी गाव ते कळसुबाई माथा
वेळ:- ६:४५ ते १०:३५
5) कळसुबाई ते बारी गाव
वेळ:- १२:१५ pm ते २:३० pm
6) बारी गाव ते शेंडी
वेळ :- २:४५ pm ते ३:०५ pm
जीपने - १० रुपये प्रत्येकी
7)शेंडी गाव ते कसारा (ST)
वेळ:- ५:४५ ते ८:०५
8) कसारा ते ठाणे (लोकल ट्रेन)
वेळ:- ८:१५ ते